Satbara Utara Maharashtra App


Satbara Utara Maharashtra App

Description
7/12 Satbara Utara Maharashtra applicationprovide information about 7/12, 8(a), 6 etc,total area, totalassessment value, tenure, land, land use, name of farmer, ownershipdetails and bhoja (loan) of Maharashtra state in India. Farmer, Land broker and buyer can get detail of the land viaentering the survey no, village, taluka & district names. SaveAll as PDF सातबारा उतारा व जमीन मोजणी ---------------------------------------------------- आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणानेआपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिकझालेले दिसतात. बर्‍याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जितकिंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्याआजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीरबाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्यापिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचेउतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फारमाहिती असलेली दिसत नाही. तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनीसंदर्भातअत्यंत महत्वाच्या अशा उतार्‍याची माहिती करुन घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची जिल्हे,तालुके,गावे,खेडी यात विभागणी झालेलीआहे.यात जे जमिनीचे क्षेत्र आहे,या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जेडोंगर, नदी,नाले व समुद्राच्या किनार्‍याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचाजो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्रअसते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन,पडिक जमिन,माळरान जमिन,गावठाणअशा बर्‍याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो. विशेष वैशिष्ट्ये :- ------------------ > ७/१२ चा उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव,आडनाव, संपूर्ण नाव द्वारे search करून > या सर्व मिळकतींचे मुल्यांकन दर (सरकारी दर) आपण या ॲपद्वारेऑनलाईन पाहू शकता. > तुमचा ७/१२ चा उतारा save करा PDF स्वरुपात > विभाग निहाय वर्गीकरण > समजण्यास सोपा > Easy too use > Faster Loading ७/१२ चा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. कारण हा उतारावाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्यालाबसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूलकायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांबाबत विविध नोंदणी ठेवल्याजातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) यारजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्यापिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकारचेगावचे नमुने ठेवलेले असतात. यापैकी गावचा नमुना नं ७ आणि गावचा नमुनानं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्‍याला सातबाराउतारा असे म्हणतात. ७/१२ उतारा काय दर्शवितो? प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे सातबाराउतार्‍यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना१२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येकगावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.

Download

Download - Apple Iphone/iOS
Dailyhunt India FlahLite
About us | Privacy Policy | DMCA | Terms and Conditions | Contact us
2015 - 2017 © All Rights Reserved